
शेवगा, ज्याला सहजन किंवा ड्रमस्टिक देखील म्हणतात, ही एक अत्यंत पौष्टिक भाजी आहे. यात व्हिटॅमिन, मिनरल आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, ज्यामुळे आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात.
शेवगा भाजीचे फायदे –
- पोषक तत्वांनी समृद्ध – शेवगा भाजीमध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन ए, सी आणि ई यांसारखे आवश्यक पोषक तत्वे असतात.
- रोगप्रतिकारशक्ती वाढवते – अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजार होण्याचा धोका कमी होतो.
- हृदयविकारांसाठी फायद्याचे -शेवगामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदयविकार आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.
- पचन सुधारते – फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते.
- त्वचेसाठी चांगली – व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतात.
- सांधेदुखी आणि स्नायूंच्या दुखण्यात आराम – शेवग्याच्या पानांचे सेवन केल्याने सांधेदुखी आणि स्नायूंच्या दुखण्यात आराम मिळतो.
- कॅलरीज कमी – शेवगा भाजीमध्ये कॅलरीजची (Calories) खूप कमी असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.