
Tur Markate :सध्या तुरीचे बाजारभाव हमीभावाच्या खाली आले आहेत, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १३ फेब्रुवारीपासून हमीभावाने तूर खरेदी सुरू केली आहे. राज्यातील ३१५ केंद्रांना मंजुरी मिळाली असून, पुढील ९० दिवस तूर खरेदी प्रक्रिया सुरू राहणार आहे.
Tur kharedi Prbhani Centre:परभणी, दि. 20 (जिमाका) : केंद्र शासनाचे आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्यावतीने खरीप हंगाम 2024-25 मध्ये तुर खरेदी करण्याकरीता खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले असून सदर खरेदी केंद्राच्या ठिकाणी तुर खरेदी करण्याकरीता नोंदणी दि. 24 जानेवारी ते 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत करण्यात येणार आहे. तसेच तुर खरेदी दिनांक 13 फेब्रुवारी ते 13 मे 2025 पर्यंत खालील खरेदी केंद्रावर सुरु करण्यात आलेली आहे.
केंद्राचे नाव, पत्ता, ठिकाण, केंद्रचालकाचे नाव व मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. परभणी तालुका सह खरेदी विक्री संघ, मोंढा परभणी (प्रताप दिगंबरराव देशमुख-9881522212), जिंतुर तालुका जिनींग ॲन्ड प्रेसींग सह सो. लि. जिंतूर (पारवे एस.डी.-7588431377), पूर्णा तालुका सह खरेदी विक्री संघ, मोंढा पूर्णा (संदीप घाटोळ-9359333413), मानवत तालुका सह खरेदी विक्री संघ, मार्केट यार्ड मानवत (मानिक भिसे-9860654159), स्वस्तिक सुशिक्षित बेरोजगार सेवा सह संस्था, मार्केट यार्ड, पाथरी (अनंत गोलाईत- 9960570042), स्वप्नभूमी सुशिक्षित बेरोजगार सेवा सह संस्था, सोनहारी वेअरहाउस, शेळगाव रोड, सोनपेठ (श्रीनिवास राठोड-9096699697), तुळजाभवानी कृषी विकास सेवा सह संस्था म. बोरी (संतोष गुलाबराव शिंदे-7620194426), तुळजाभवानी कृषी विकास सेवा सह संस्था म. बोरी, मार्केट यार्ड, सेलू (विठ्ठल गुलाबराव शिंदे-9860986854).
किसानजीवन ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. पेडगांव, पेडगांव ता. परभणी (नारायणराव देशमुख-7020844932), भुमीपुत्र फळे व भाजीपाला खरेदी विक्री व प्र. सह संस्था मर्या. वरपुड (अजित अनिलराव वरपुडकर-9404045555), कृषीराज फळे व भाजीपाला खरेदी विक्री व प्र. सह संस्था म. मिरखेल, झरी ता. परभणी (ज्ञानेश्वर जाधव-8698195426), सिध्दी मानवत ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, रुढी पाटी ता. मानवत (विजय मुळे-7620253820).
तरी शेतकरी बांधवांनी आपल्या तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क करुन नोंदणी करावी. नोंदणी करीता सोबत खरीप हंगाम 2024-25 मधील सातबारावर ऑनलाईन पिकपेरा नोंद असावी, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स सोबत आणावी. बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड, स्पष्ट असावा. जनधन बँक खाते क्रमांक किंवा पतसंस्थेतील खातेक्रमांक देऊ नये. संबंधित तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी तुर हमीभावाने खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी केले आहे.